राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
  • केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना.
  • केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते.
  • 100 % केंद्र पुरस्कृत योजना
  • उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीत यंत्रणेची
  • लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध
  • उद्देश :-
  • ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे
  • ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी
  • बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी
  • केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप
  • अनुदान वितरण :-
  • सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र
  • अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र
  • शौचालय जोडणी केल्यास - रु. 1,200/- प्रति संयत्र
  • संपर्क :-
  • जिल्हा स्तरावर - कृषी विकास अधिकारी
  • तालुका स्तरावर - गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)