कॅडर मॅनेजमेंट सिस्टिम

  • योजनेचा हेतू : राज्यातील सर्व जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांच्या सर्व आस्थापनाविषयक बाबींसाठी कॅडर मॅनेजमेंट सिस्टीम बनविणे प्रस्तावित होते.
  • प्रकल्पाची वाटचाल : याबाबतचे Deliverables, As is Report, Detail Project Report, BPR इ. डॉक्युमेंट्स वेळोवेळी सल्लागारांनी सादर केले होते. त्याच वेळेस सदर प्रणालीशी समरूप असणारे मे. एन.आय.सी. यांचे प्रोडक्ट, महाऑनलाईनचे प्रोडक्ट, इतर राज्यांत याबाबत चालू असलेली कार्यवाही, यांची चाचपणी चालू होती. दरम्यान बऱ्याच कालावधीनंतर केंद्र शासनाची अंगीकृत संस्था असलेल्या  National Informatics Center (एनआयसी) या संस्थेने, हिमाचल प्रदेश येथे कार्यरत असलेल्या त्यांच्या मानव संपदा या प्रणाली विषयी माहिती कळविली. विभागाच्या दि.१६/०९/२०१७ व दि.१५/११/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स विषयक प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत यावर सांगोपांग चर्चा होउन एनआयसीचे सदर Application (जे already तयार आहे व थोडे customize करून Roll out करू शकतो) ‍लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत एन.आय.सी. मुंबई, एन.आय.सी. पुणे, एन.आय.सी. हिमाचल प्रदेश, यांच्याशी समन्वय साधत जिल्हा परिषद नागपूर येथे याबाबतचा पायलट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 
  • सदर प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येत आहे.
  • शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण -२०१८ / प्र क्र १०९/आस्था ७ दि -०८-०३-२०१९ अन्वये जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके संगणकीकृत करण्यात येत आहेत.