बंद

    यशवंतराव पंचायत राज अभियान पुरस्कार

    • तारीख : 12/03/2006 -

    राज्य पुरस्कृत

    योजना कधी सुरू झाली

    2005-06

    योजनेची थोडक्यात माहिती

    • सन 2005-2006 या आर्थिक वर्षापासून स्व. यशवंतरा व चव्हाण यांच्या जन्मदिनाचे (दि.12 मार्च) औचित्यसाधून विभाग स्तर व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा,
    पंचायत समित्या व ग्रामपंचायतीं साठी पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.
    • सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून राज्यातील ग्रामपंचायतींसाठी “स्मार्ट ग्राम व्हिलेज” आत नाव बदललेले आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव ही योजना नव्याने राबविण्यात येत असल्याने “यशवंत पंचायत राज अभियान” या योजनेमध्ये ग्रामपंचायती समाविष्ट
    न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
    • या पुरस्कार अभियाना अंतर्गत अतित्युकृष्ठ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांनी मागील आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचे मुल्यांकन करून निवड केली जाते.
    • पुरस्काराच्या रक्कमे सोबत स्मृतीचिह व प्रमाणपत्र देण्यात येते. तर पंचायतराज व्यसस्थेमध्ये कामकरणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवूनगौरव केला जातो.
    • विभाग स्तरावर पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या त्याविभागातील फक्त एकच पंचायत समिती आणि विभागातून प्रथम आलेली एकच जिल्हा परिषद राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतात.
    या योजने अंतर्गत राज्यशासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या राज्य व विभागस्तरावरील पुरस्कारांची संख्या खालील प्रमाणे आहे.

    • पंचायत राज संस्थांची पुरस्कारासाठी निवड करताना पुरस्काराचे स्वरुप, पुरस्कारासाठी पात्र संस्था, पुरस्कारासाठी विविध स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी व मूल्यांकन पध्दती यानुसार अत्युत्कृष्ट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या जिल्हा परिषदांना राज्यस्तरावर अनुक्रमे रक्कम रू.30.00 लक्ष, 20.00 लक्ष व 17.00 लक्ष रकमेचे बक्षीस दिले जाते.
    • तर अत्युत्कृष्ट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पंचायत समित्यांना राज्यस्तरावर अनुक्रमे रक्कम रू.20.00 लक्ष, 17.00 लक्ष व 15.00 लक्ष रकमेचे बक्षीस दिले जाते. तसेच प्रत्येक विभागस्तरावर प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाच्या पंचायत समित्यांना अनुक्रमे रक्कम रू.11.00 लक्ष, 8.00 लक्ष व 6.00 लक्ष रकमेचे बक्षीस देण्यात येते.
    • सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम महामहिम मा राज्यपाल महोदयांचे हस्ते,मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली व मा.उपमुख्य मंत्री महोदयांचे प्रमुख उपस्थितीत दरवर्षी करण्यात येतो.
    लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)

    या अभियानासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक एल-3, 2515- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, 101- पंचायती राज, 31-सहाय्यक अनुदाने (01) (04) विशेष कार्यक्रम व ग्रामअभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा परिषदांना व पंचायत समित्यांना प्रोत्साहन पर अनुदाने (2515 0062). जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची एकूण रक्कम रु.269.00 लक्ष व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठीचा खर्च यांची तरतूद दरवर्षी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात येते.

    योजनेच्या लाभाचे स्वरुप

    पंचायत राज संस्थासाठी प्रोत्साहनपर योजना असून पंचायतराज संस्थांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम समुह लाभासाठी देण्यात येते.

    योजनेचे निकष.

    दरवर्षी शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो. सदर शासन निर्णयास जोडलेली जिल्हा परिषदेसाठी परिशिष्ट अ व पंचायत समितीसाठी परिशिष्टमध्ये पंचायत राज संस्थांच्या कामगीरीचे मुल्यांकन करण्याबाबतचे निकष व मुद्दे असलेली प्रश्नावली. (दि. 23.11.2020चा शासन निर्णय सोबत जोडलेला आहे.)

    लाभार्थी:

    .

    फायदे:

    .

    अर्ज कसा करावा

    अ.क्र. पंचायतराज संस्था राज्यस्तर/विभागस्तर एकूण पुरस्काराची संख्या