Mon, 07/17/2023 - 12:20 -- dysec
ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९६० रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपचांयत आदी स्थानिकस्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विकासकामे राबविली जातात. मजबूत पंचायतराज प्रणाली मार्फत रचनात्मक, सर्वसमावेशक व स्थायी ग्रामीणविकास साधणे हे या विभागाचे ध्येय आहे