बंद

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

    • तारीख : 28/10/2015 -

    प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील न जोडलेल्या व किमान 500 लोकसंख्या वस्ती असलेल्या वाडया-वस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-1 हि योजना शासन निर्णय दिनांक : 28 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. सदरहू योजनेंतर्गत 30,598 कि.मी. लांबीची कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी रू. 18800 कोटी इतक्या किंमतीची व 29254 कि.मी. लांबीची कामे पुर्ण झाली असून उर्वरीत 1344 कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत .सदरहू कामे माहे मार्च 2025 अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे.
    02. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 ही योजना दि. 6 जानेवारी, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत 10,000 कि.मी . इतक्या लांबीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सदर उद्दिष्टापैकी माहे डिसेंबर 2024 अखेर 9610 कि.मी लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नतीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी 869.37 कि.मी. लांबीची कामे पुर्ण झाली असून उर्वरीत 9610 कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. सदरहू कामे माहे मार्च 2026 अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे.
    03. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 मधील 10,000 कि.मी उद्दिष्टाव्यतिरीक्त संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजीच्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 मधील (बॅच-1) ,संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त 7000 किमी लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती Thin White Topping (TWT) (सिमेंट कॉंक्रीटीकरण ) या तंत्राद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
    तसेच, राज्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात संख्या पाहता, शासनाने दि.16 मार्च,2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये, एकुण 23000 कि.मी.लांबीचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक येाजना टप्पा-3 अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत.

    शासन निर्णय/परिपत्रक: दि.28 डिसेंबर 2015 ,दि.06 जानेवारी 2022 ,दि.15 फेब्रुवारी 2024 ,दि.16 मार्च 2024.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार,शेती,आरोग्य,शिक्षण,ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळाली आहे.

    अर्ज कसा करावा

    निरंक