बंद

    मा. लोक्रपतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे

    • तारीख : 24/03/2015 -

    राज्य पुरस्कृत

    योजना कधी सुरु झाली

    शासन निर्णय क्र.विकास 2009/प्र.क्र.193/पंरा-8,दि.24/02/2009 अन्वये सदर योजना सुरु करण्यात आली आहे. View

    योजनेची थोडक्यात माहिती

    राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सन 2008-09 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या निकष व कार्यपध्दती संदर्भात वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. शासन निर्णय क्र.विकास-२०१५/प्र.क्र.५२/यो-६, दि.27.03.2015 अन्वये खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे सदर योजना जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणेमार्फत राबविण्यात येते.

    लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)

    लेखाशीर्ष 2515 1238
    सन 2021-22 वित्तीय तरतूद रु. 500.00 कोटी

    योजनेच्या लाभाचे स्वरुप

    गांव/ ग्रामपंचायत

    अर्ज कुठे करावा

    लोकप्रतिनिधींकडून म्हणजेच अ) खासदार ब) आमदार क) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीचे सदस्य यांनी त्यांच्या भागातून सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव ग्राम विकास विभागास थेट सादर करावेत.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    मुलभूत सुविधा पुरविणे

    अर्ज कसा करावा

    लोकप्रतिनिधींकडून म्हणजेच अ) खासदार ब) आमदार क) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीचे सदस्य यांनी त्यांच्या भागातून सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव ग्राम विकास विभागास थेट सादर करावेत.