कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम
राज्य पुरस्कृत
योजना कधी सुरु झाली
शासन निर्णय क्र. कोवियो-2013/प्र.क्र.71/योजना -९, दि. २६.०८.२०१३ अन्वये योजना सुरु करण्यात आली आहे. सदर शासन निर्णय अधिक्रमित करुन योजनेच्या सुधारीत तरतूदी शासन निर्णय क्र. ग्रासयो-2015/ प्र.क्र. 75/ योजना-9, दिनांक 23.11.2015 अन्वये विहीत करण्यात आल्या आहेत.
योजनेची थोडक्यात माहिती
कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे या करीता ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटनाचा विकास होणा-या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे या उद्देश्याने राज्य शासनाने “कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम” ही योजना सन 2013-14 पासून सुरु केलेली आहे.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करणे व आराखड्यातील कामांना मंजूरी देण्याकरीता कोकणातील 5 जिल्ह्यांकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी समिती व मा.राज्यमंत्री, ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती दिनांक 23.11.2015 च्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आलेली आहे.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
कोकण पर्यटन विकास कार्यक्रम – लेखाशीर्ष 25152432.
तरतूद (सन 2021-22) :- रु. 15.00 कोटी
लाभार्थी:
गांव/ ग्रामपंचायत
फायदे:
-
अर्ज कसा करावा
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद