रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम
राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती योजनेत्तर (लेखाशिर्ष क्र.3054-2419) हा कार्यक्रम सन 2012-13 आर्थिक वर्षापासून ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येतो. रस्ते विकास आराखडा 2001-21 नुसार राज्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकूण लांबी 2,36,000 कि.मी. इतकी आहे. ग्राम विकास विभागाच्या दि.10 सप्टेंबर, 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमांतर्गत रस्त्यांच्या कामांची गट-अ, ब, क, व ड अशा चार गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. गट-अ/ड मध्ये किरकोळ दुरुस्ती (उदा. खड्डे भरणे, बाजूपट्ट्या तासणे, उखडलेले कठडे/पॅरापेट दुरुस्ती) स्वरुपाची कामे व गट-ब/क मध्ये विशेष दुरुस्ती व पूलांच्या दुरुस्तींची कामे (उदा. रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण, सुधारणा, पुल/मोऱ्यांची दुरुस्ती) हाती घेतली जातात.
शासन निर्णय: दि.10 सप्टेंबर, 2012
पात्रता/निकष : ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग याच रस्त्यांची व त्यावरील पूलांची देखभाल व दुरुस्ती
लाभार्थी:
लागू नाही
फायदे:
ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार, शेती, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळत आहे.
अर्ज कसा करावा
जिल्हा परिषद स्तरावर