रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम
वर्णन
राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती योजनेत्तर (लेखाशिर्ष क्र. 3054-2419) हा कार्यक्रम सन 2012-13 या आर्थिक वर्षापासून ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. रस्ते विकास आराखडा (2001–2021) नुसार राज्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकूण लांबी सुमारे 2,36,000 कि.मी. इतकी आहे.
ग्राम विकास विभागाच्या दिनांक 10 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमांतर्गत रस्त्यांच्या कामांची गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड अशा चार गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. गट-अ व गट-ड अंतर्गत किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात येतात, जसे की खड्डे भरणे, बाजूपट्ट्या तासणे, उखडलेले कठडे किंवा पॅरापेट दुरुस्ती.
गट-ब व गट-क अंतर्गत विशेष दुरुस्ती व पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण, सुधारणा तसेच पुल व मोऱ्यांची दुरुस्ती यांचा समावेश होतो.
शासन निर्णय
दिनांक 10 सप्टेंबर 2012
पात्रता / निकष
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यांची तसेच त्या रस्त्यांवरील पुलांची देखभाल व दुरुस्ती ही या कार्यक्रमांतर्गत पात्र आहे.
लाभार्थी:
लागू नाही
फायदे:
ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार, शेती, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळत आहे.
अर्ज कसा करावा
जिल्हा परिषद स्तरावर