अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (३०५४-२९११)
योजनेचे नाव : अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (लेखाशिर्ष 3054-2911)
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या/पूलांच्या दुरुस्तीकरिता अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (3054-2911) ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर-2022 मध्ये घेतला आहे. त्यानुसार सदर योजनेतंर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीमधून मंजूर करावयाच्या कामांची व्याप्ती व कार्यपध्दती विभागाच्या दि.09 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन पावसाळा संपल्यानंतर माहे ऑक्टोबर अखेरपर्यंत शासनास प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.
शासन निर्णय : दि. 09 फेब्रुवारी, 2023.
पात्रता/निकष : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग याच रस्त्यांची व त्यावरील पूलांची देखभाल व दुरुस्ती.
लाभार्थी:
-
फायदे:
ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार, शेती, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळत आहे.
अर्ज कसा करावा
लागू नाही.