बंद

    १०० दिवस कार्यक्रम अहवाल

    ग्राम विकास व पंचायत राज विभाग (https://rdd.maharashtra.gov.in/)
    100 दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती

    100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये- ग्राम विकास विभागाची उद्दिष्टे व ती साध्य केल्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

    अनु. क्र मुद्दा कार्यवाही पुर्ण/ अपुर्ण पुर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/ फोटो/ इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपुर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पुर्ण करण्याची कालमर्यादा
    1 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत किमान 13,00,000 घरकुलांना मंजूरी देणे पुर्ण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 13,60,084 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.–>
    2 3,00,000 मंजुर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून एकुण रू.450 कोटी वितरीत करणे पुर्ण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 12,85,553 मंजुर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून एकुण रू.2062.06 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
    –>
    3 किमान 1,00,000 घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे पुर्ण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 1,48,542 इतकी घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्यात आली आहेत.–>
    4 किमान 5,000 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे. पुर्ण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 23,333 भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. –>
    5 ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी 1 जानेवारी, 2025 ते 10 एप्रिल, 2025 असे 100 दिवसाचे महा आवास अभियान राबविणे पुर्ण ग्राम विकास विभागाच्या दिनांक 01 जानेवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये दिनांक 01 जानेवारी, 2025 ते दिनांक 10 एप्रिल, 2025 या कालावधीत 10 उपक्रमांचा समावेश असलेले महा आवास अभियान राबविण्यात आले आहे.5- 1.1.2025 GR
    6 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना विविध बँके‌द्वारे रू. 2,000 कोटी बँक पतपुरवठा उपलब्ध करून देणे पुर्ण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना विविध बँके‌द्वारे रू. 2606.39 कोटी बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. –>
    7 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10,00,000 लखपती दीदी तयार करणे पुर्ण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10,27,918 इतक्या लखपती दीदी तयार करण्यात आल्या आहेत.–>
    8 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना रू.300 कोटी समुदाय निधी उपलब्ध करून देणे. पुर्ण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना रू.463.32 कोटी इतका समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. –>
    9 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 3,00,000 वैयक्तिक/ग्रुप उ‌द्योगाची उभारणी करणे पुर्ण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 3,15,226 इतक्या वैयक्तिक/ ग्रुप उ‌द्योगाची उभारणी करण्यात आली आहे.–>
    10 पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांतील 1,00,000 लोक प्रतिनिधींचे प्रशिक्षण पूर्ण करणे. पुर्ण पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांतील एकुण 1,20,002 लोक प्रतिनिधींचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले आहे. –>
    11 राज्यातील 79 ग्रामपंचायतींमध्ये पंचायत अध्ययन केंद्राची निर्मिती करणे. पुर्ण राज्यातील 79 ग्रामपंचायतींमध्ये पंचायत अध्ययन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. –>
    12 राज्यातील सर्व 27,945 ग्रामपंचायतींचे सन 2025-26 या वर्षाचे ग्राम पंचायत विकास आराखडे तयार करणे. पुर्ण राज्यातील सर्व 27,945 ग्रामपंचायतींचे ग्राम पंचायत विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत.–>
    13 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III अंतर्गत 1500 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती पुर्ण करणे. पुर्ण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III अंतर्गत 1531.73 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. –>
    14 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत 100 दिवसांत 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती पुर्ण करणे. पुर्ण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत 100 दिवसांत 2600.35 लांबीच्या रत्यांची दर्जोन्नती पुर्ण करण्यात आली आहे. 14- 2600.35 MMGSY
    15 15 वा वित्त आयोगाचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे मिळालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणूकीबाबतचा विषय मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या अटीतून सूट मिळण्‍यासाठीचे पत्र केंद्र शासनास पाठवावे. पुर्ण सन 2022 पासून 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समितीमध्ये प्रशासक कार्यरत आहेत. प्रशासक कार्यरत असल्यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा रोखून ठेवलेला निधी वितरीत करण्याबाबत पंचायती राज मंत्रालय आणि वित्त मंत्रालय भारत सरकार यांना पत्र देण्यात आलेली आहेत.
    1. तत्कालीन मा.मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या स्वाक्षरीने दि.19.7.2023 आणि दि.07.12.2023 रोजी मा.मंत्री (पंचायती राज मंत्रालय), भारत सरकार यांना पत्रे देण्यात आली आहेत.
    2. मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीने दि.04.01.2025 रोजी मा.वित्त मंत्री महोदया, भारत सरकार यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
    3. मा.प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या स्वाक्षरीने दि.13.01.2025 रोजी मा.सचिव (पंचायती राज मंत्रालय), भारत सरकार यांना पत्र देण्यात आले आहे.
    4. दि.04.03.2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या Empowered Committe च्या बैठकीत मा.प्रधान सचिव यांनी रोखून ठेवलेला निधी वितरण करण्याची मागणी केली.
    5.मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीने दि.04.03.2025 रोजी मा.पंतप्रधान महोदय यांना पत्र पाठविण्यात आलेले आहे.
    16 लोक प्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणेसह अन्य कामाची द्विरूक्ती होऊ नये, याकरिता ग्राममानचित्र या पंचायत राज मंत्रालयाच्या GIS वेबपोर्टल चा वापर करून Single Unified Portal विकसित करणे तसेच प्रत्येक कामास Infra UID देणे पुर्ण ग्राम विकास विभागाच्या दिनांक 4 एप्रिल, 2025 रोजीच्या पत्रान्वये Single Unified Portal दिनांक 01 एप्रिल, 2025 पासून सर्व जिल्हा परिषदांमध्ये Go Live करण्यात आली आहे. 16- 4.4.2025 Single Unified Portal
    17 रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम (3054-2419) अंतर्गत 1000 कि.मी. लांबीची कामे पुर्ण करणे. पुर्ण रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम (3054-2419) अंतर्गत 1200 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे पुर्ण करण्यात आली आहे. –>
    18 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत 296 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता दिलेल्या एकुण 1,587 विविध विकास कामांपैकी 500 कामे पूर्ण करणे. पुर्ण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत 296 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता दिलेल्या एकुण 1,587 विविध विकास कामांपैकी 502 कामे पुर्ण करण्यात आली आहे. –>
    19 संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत 1348 तांड्यांना विकास कामासाठी मार्च, 2025 पर्यंत रू.100 कोटीच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देणे. पुर्ण संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत तांड्यांच्या विकास कामांसाठी मार्च, 2025 अखेर वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेला रू.69.69 कोटी इतका निधी संबंधित जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आला आहे. 19- 69.69 संत सेवालाल महाराज
    20 ग्रामीण भागात पाणंद रस्ते तयार करणे पुर्ण राज्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्याच्या हद्दी निश्चित करुन दर्जेदार शेत रस्ते तयार करण्यासाठी मा. मंत्री (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली दि.16.01.2025 दि.6.2.2025 रोजी ग्राम विकास व रोजगार हमी योजना विभागासमवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत दर्जेदार शेत रस्ते तयार करण्यासाठी नागपूर पॅटर्नचा अभ्यास करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
    त्यानुसार शेत/पाणंद रस्ते तयार करण्यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या नागपूर पॅटर्नची माहिती घेण्यासाठी मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांचे अध्यक्षतेखालीदि.14.2.2025 रोजी बैठक पार पडली. सदर बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, नागपूर यांचेकडून प्राप्त अहवाल दि.11.3.2025 रोजी पुढील कार्यवाहीसाठी रोजगार हमी योजना विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
    तसेच मा.मंत्री (रो.ह.यो.) यांचे अध्यक्ष्तेखाली व मा. राज्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे उपस्थितीत शेत/पाणंद रस्ते तयार करण्याबाबत दि.8.4.2025 रोजी बैठक संपन्न झाली.
    त्यानुसार पुढील कार्यवाही रो.ह.यो. विभागाकडून अपेक्षित आहे.
    एकुण एकुण संख्या- 20 एकुण पुर्ण कामांची संख्या- 20 एकुण अपुर्ण कामांची संख्या-0