परिचय
केंद्र शासनाने 12 व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांचे एकत्रीकरण करुन पंचायतीराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी “राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान-RGPSA” हा एकछत्री कार्यक्रम सन 2013-2018 या कालावधीत दिनांक: 3 मार्च, 2014 च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविला.
सन 2018-2019 ते सन 2021-2022 या कालावधीत या योजनेचे पुनर्गठन करुन “राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान” ही केंद्र पुरस्कृत योजना दिनांक: 20 फ़ेब्रुवारी, 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात आली. केंद्र शासनाने यात काही सुधारणा करुन दिनांक- 01.04.2022 ते दि.31.03.2026 या कालावधीमध्ये “पुनर्रचित (Revamped) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान” अशी योजना जाहीर केलेली आहे. सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत असून या योजनेच्या निधीचे प्रमाण हे केंद्र हिस्सा 60 % व राज्य हिस्सा 40% असे आहे. दिनांक: 16 सप्टेंबर, 2022 रोजी ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.