तक्रार नोंदणी
तक्रार निवारण पोर्टल
महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलेले आहे. नागरिकांनाआपली तक्रार योग्य त्या कार्यालयात दाखल करता येईल. तक्रार सादर केल्यानंतर टोकन नंबर प्राप्त होईल. सदर टोकन नंबरच्या मदतीने तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या तक्रारीचे निराकरण सक्षम प्राधिकरणाकडून २१ कार्यालयीन दिवसांच्या कालावधीत केले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक “”समाधानी”” / “”असमाधानी”” असा अभिप्राय देऊ शकतात. जर नागरिक असमाधानी असल्यास ते आपली तक्रार उच्च प्राधिकरणाकडे हस्तांतरित करु शकतात.