प्रोजेक्ट मॉनिटरिंग सिस्टिम

  • योजनेचा हेतू : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कामांमध्ये एकसुत्रता यावी व त्यांची  उपयोगिता वाढावी, यासाठी कामांच्या Estimation पासून प्रकल्पांच्या अंमलबजावणी पर्यंत एक सर्वसमावेशक ॲप्लीकेशन बनविण्याचे प्रस्तावित होते.
  • योजनेची वाटचाल : यासाठीचे Deliverables, As is study, BPR सल्लागारांकडून प्राप्त झाले आहे. विभागात यापूर्वी कार्यरत असलेल्या कन्स्ट्रक्शन ट्रॅकर या आज्ञावलीचे स्वरूप तपासून त्यातच काही सुधारणा करता येतील किंवा कसे, याबाबत प्रयत्न करण्यात आले. दरम्यानच्या काळात इतर विभागामध्ये सुरू असलेल्या पी.एम.एस मॉड्यूल्सची चाचपणी करण्यात आली. याबाबत महाऑनलाइन,  एन. आय. सी. , सीडॅक या संस्थांकडून तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या तयार सॉफ्टवेअर प्रणालीची चाचपणी करण्यात आली.

दरम्यान सदर प्रकल्पाबाबत आरएफपी चे प्रारूप तयार करून सदर प्रारुपाच्या मान्यतेसाठी दि.१६.०९.२०१७ रोजीच्या विभागाच्या ई-गव्हर्नन्स विषयक प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक घेण्यात आली तसेच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार याबाबतचा प्रस्ताव माहिती तंत्रज्ञान विषयक मा.उच्चाधिकार समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्याकरिता दि.१५.११.२०१७ रोजी माहिती तंत्रज्ञान संचालनालयास पाठविण्यात आला. तथापि, त्याच कालावधीत सीडॅक या केंद्रशासनाच्या संस्थेकडून त्यांच्याकडे तयार असलेले व  ओरीसा राज्यात सध्या कार्यरत असलेले work and account management system या ॲप्लीकेशन बद्दल माहिती प्राप्त झाली व सदर ॲप्लीकेशन राबविण्याचा तत्वत: निर्णय विभागातर्फे घेण्यात आला आहे.       

प्रकल्प प्रायोगिक स्तरावर जिल्हापरिषद नाशिक येथे यशश्वी रित्या राबविण्यात आला असून आता संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक मेजरमेन्ट बुक तयार करण्यात येत आहेत .