महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label

रस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान

महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्तीची विज देयके भागविण्यासाठी ग्रामपंचायतीना 100% अनुदान देण्याचा शासनाने सन 1990 साली निर्णय घेतला आहे.

वितरण: सन 2003 पुर्वी सदर अनुदान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वितरीत करण्यात येत होते व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतींना सदर अनुदान वितरीत करीत होते.सदर प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी सन 2003 पासून महाराष्ट्र राज्य विद्दुत महामंडळास ग्राम विकास विभागामार्फत अनुदान वितरीत करण्यात येते.