महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label

राज्य पुरस्कृत योजना

जन गणना २०११ वर आधारीत ग्रामपंचायतनिहाय माहिती कोष

जन गणना २०११ वर आधारीत ग्रामपंचायतनिहाय माहिती कोष

अधिक जन गणना २०११ वर आधारीत ग्रामपंचायतनिहाय माहिती कोष

योजनेचे नांव : ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान

योजनेचे स्वरुप : जिल्हास्तरीय योजना

योजनेबाबतचा तपशिल :

दहन-दफन भूमी – इतर कार्यक्रम ही जिल्हास्तरीय योजना शासनामार्फत राबविण्यात येत होती. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागातील ज्या गावात दहन- दफन भूमीसाठी ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध नसेल अशा गावांच्या बाबतीत खाजगी जमीन संपादित करण्यासाठी केवळ भू-संपादनाचा खर्च भागविण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येत होते. परंतू ग्रामीण भागात दहन-दफन भूमीची मागणी व यासाठी लागणा-या इतर अनुषंगीक सोयी सुविधांबाबत ग्रामपंचायतींच्या मागण्या शासनास प्राप्त होत होत्या. त्यामुळे सदरची योजना विस्तारित करुन सन 2010-11 या आर्थिक वर्षापासुन “ ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान ” ही नविन जिल्हा वार्षिक योजना राज्यात सुरु केली. या योजनेअंतर्गत खालील कामेअंतर्भूत आहेत-

  • ग्रामीण भागात दहन-दफन भूमीसाठी भूसंपादन, चबुत-याचे बांधकाम, शेडचे बांधकाम, पोहोच रस्ता, कुंपण व संरक्षण भिंत.
  • ग्रामपंचायत भवन / कार्यालय इमारत बांधणे अथवा अंतर्गत सुविधा उपलब्ध करुन देणे, पुनर्बांधणी करणे, ग्रामपंचायतींच्या आवारामध्ये वृक्षारोपणकरणे, परिसर सुधारणे, परिसराला कुंपण घालणे.
  • ग्रामपंचायत कार्यालये (सर्व शासकीय कर्मचा-यांच्या कार्यालयासहीत)
  • गावांतर्गत रस्ते व गटारे
  • दहन व दफन भूमी
  • बस थांबा शेड

.